belgaum-bhagyanagar-akshata-mamadapur-missing-belgaum-woman-tilakwadi-202105.jpg | बेळगाव : भाग्यनगर येथून विवाहिता बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : भाग्यनगर येथून विवाहिता बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भाग्यनगर, पाचवा क्रॉस येथील विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद टिळकवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. अक्षता नवीन ममदापूर (वय 27, रा. भाग्यनगर, पाचवा क्रॉस) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. अक्षता ही गुरुवार 27 रोजी सकाळी 9.30 वाजता घरातूर बाहेर पडली आहे. त्यानंतर ती घरीच परतलीच नाही. घरातून बाहेर जाताना तीने कोणालाच काही सांगितले नाही. आजपर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
2017 मध्ये हुबळी येथील अक्षताशी नवीन भीमसेन ममदापूर यांचे लग्न झाले होते. अक्षता कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या, त्या आजतागायत फिरकल्या नाहीत. अक्षताची उंची 5.5 फूट आहे. चेहरा लांब आहे. लांब नाक आहे. काळे केस आहेत. बांध्याने साधारण असून ती घरातून बाहेर पडताना तीने अंगावर भगवा रंगाचा कुडता आणि काळ्या रंगाची लेगीन परिधान केली आहे. ती कन्नड, तेलगु, इंग्रजी भाषा बोलते. तरी सदर तरुणी विषयी कोणाला माहिती मिळाल्यास टिळकवाडी पोलिसांशी संपर्क (0831-2405236 अथवा 9480804052) साधावा, असे कळविण्यात आले आहे.