s-sureshkumar-karnataka.jpg | कर्नाटक : बारावी परीक्षा लांबणीवर; अकरावी विद्यार्थी थेट पास | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटक : बारावी परीक्षा लांबणीवर; अकरावी विद्यार्थी थेट पास

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka PUC 2 Exams 2021 Postponed, new dates to be announced well in advance

कर्नाटक : कर्नाटकात 12 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने तसेच वाढत्या कोरोनामुळे बारावी परीक्षा (PUC Board Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पदवीपूर्व शिक्षण खात्याने बजावला आहे. 24 मे ते 16 जूनपर्यंत बारावीच्या परीक्षा होणार होत्या. त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Karnataka 2nd PUC exams postponed over Covid-19
शिक्षण खात्यातील अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली. आता बारावी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक 15 ते 20 दिवसानंतर देण्यात येणार आहे. तसेच अकरावीच्या (puc 1st year) सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अकरावी विद्यार्थी परीक्षेविना बारावीत जाणार आहेत. कर्नाटक राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन बारावीच्या नियोजित परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
राज्यभरातील कोविड-19 प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पालकांनी, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या मागणीचा विचार करता विभागाने हा निर्णय घेतला आहे.
Class 12 Board Exams 2021: In the wake of rising covid cases across the state, the Karnataka government has decided to postpone Class 12 (second PUC) exams. Karnataka Education Minister S Suresh Kumar made an announcement regarding the same. He also asserted that Class 11 (1st PUC) students will be promoted without any examinations and teachers will be allowed to work from home due to the COVID-19 pandemic. Notably, the Karnataka PUC II Exams 2021 were earlier scheduled to begin from May 24. Earlier the state government had postponed Karnataka PUC II Exams 2021 practical tests. It had decided to conduct the class 12 practical exams in June after theory papers.