ipl.jpeg | IPL कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएल रद्द | belgaum news | belgavkar बेळगावकर

IPL कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएल रद्द

belgavkar.com | belgaum | belgavkar

IPL 2021 Suspended: कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळं यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द

IPL देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते. मात्र तरीही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला.
त्यामुळे कालचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता.त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. दरम्यान काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे.
कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण : कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला होता.