बेळगाव : मारुती गल्लीमधील मेडिकलविरोधात गुन्हा CoronaVirus | Lockdown

बेळगाव : मारुती गल्लीमधील मेडिकलविरोधात गुन्हा CoronaVirus | Lockdown

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली मारुती गल्लीमधील मेडिकलविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, दुकान आणि व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, परवानगी देताना कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सक्ती केली आहे. मारुती गल्लीतील एका नामांकित मेडिकल दुकानात त्याचे पालन होत नसून मेडिकलमध्ये सतत गर्दी दिसत होती.
मेडिकलसमोर रांग लावण्यासाठीही प्रयत्न केले जात नसल्यामुळे मेडिकल चालकाविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत खडेबाजार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मेडिकल हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने दिवसभर सुरू असते. परंतु, त्यांनी देखील सामाजिक अंतर, प्रत्येकाने मास्क घातला आहे की नाही, याची शहानिशा मेडिकल दुकानदारांनी करावी, असा दंडक आहे. परंतु, या मेडिकलमध्ये गर्दी होऊन सर्व नियम धाब्यावर बसवले जात होते.
याची माहिती खडेबाजारचे निरीक्षक रवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः तेथे जाऊन मेडिकल चालकाला समज दिली. सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षकांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी तेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनये, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन निरीक्षक रवी यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मारुती गल्लीमधील मेडिकलविरोधात गुन्हा CoronaVirus | Lockdown

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm