belgaum-vidyanagarvthree-members-of-family-died-due-to-coronavirus-belgaum-202105.jpg | बेळगाव : हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू | कुटुंब उद्ध्वस्त! | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू | कुटुंब उद्ध्वस्त!

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पहिल्या दु:खद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांना जीव सोडवा लागल्याची हृदयद्रावक घटना क्वचितच घडते. बेळगावमधील विद्यानगर येथे एकाच कुटुंबातील आई - वडिलासह मुलाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर भीतीही निर्माण झाली आहे.
विद्यानगर येथील रहिवासी पार्वती कृष्णा तेरगाव (वय 76) यांचा 24 एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झाला. तर त्यांचे पती निवृत्त उपनोंदणी अधिकारी कृष्णा तेरगाव (वय 80) यांचा 29 एप्रिल रोजी मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा प्रशांत (वय 46) याला कोरोनाची लागण झाली होती. त्याचाही सोमवार 3 मे रोजी मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली असून हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.
बॉक्साईट रोडवरील तेरगाव कुटुंबीयांपैकी तिघांचा गेल्या 9 दिवसांत मृत्यू झाला आहे. कुटुंबीयातील सातपैकी तिघांचा मृत्यू झाल्याने बॉक्साईट रोड भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मयत निवृत्त उपनोंदणी अधिकारी आणि मुलगा प्रशांत हे दोघेही आता स्टँप लिहिणे तसेच खरेदी - विक्रीचे व्यवहार करून देण्याचे काम करीत होते. एकाच कुटुंबातील हे तिघेही दगावल्यामुळे इतर कुटुंबातील व्यक्तीवर आणि नातेवाईकांवर संकट कोसळले आहे.