belgaum-police-asi-warning-to-young-woman-covid-rule-break-in-belgaum-market-202105.jpg | बेळगाव : पोलिस तिला म्हणाले दुकान उघडले तर पायच मोडतो; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पोलिस तिला म्हणाले दुकान उघडले तर पायच मोडतो;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली सकाळीच्या वेळेत गर्दीचा महापूर उसळत आहे. भाजीपाला व किराणाशिवाय ईतर दुकाने उघडल्याने पोलिस व व्यापाऱ्यामध्ये बाचाबाची झाल्याचे प्रकार बाजारपेठेत घडले. कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन सरकार करत असले तरी बेळगावच्या गणपती गल्लीत सातत्याने सांगूनही दुकान उघडणाऱ्या तरुणीला सोमवारी सहायक उपनिरीक्षकाने चक्क पाय मोडण्याची धमकी दिली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गणपत गल्लीत हा प्रकार घडला.
पोलिस व या तरुणीमध्ये चांगलाच वाद झाल्यानंतर चिडलेल्या एएसआयने अशी धमकी दिली. सर्व व्यवहार दुपारी 12 वाजता बंद करण्याची सूचना केली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता काही दुकाने अद्यापही सुरू राहात आहेत. त्यामुळे खडेबाजार पोलिसांनी सोमवारी दुपारी फेरफटका मारला. यावेळी काही दुकाने सुरू होती. यामध्ये सदर तरुणीने आपले कापड दुकान सुरू ठेवले होते.
तीनवेळा सांगूनही दुकान का उघडतेस, असा प्रश्न करत एएसआयने तिला धारेवर धरले. इतर सर्व दुकाने बंद करा व मग मला सांगा, असा पवित्रा या तरुणीने घेतल्याने वाद वाढला. यानंतर एएसआयने युजलेस फेलो, सतत सांगूनही समजत नाही का, उद्या दुकान उघडले तर पाय मोडेन, अशी धमकी दिली. त्यानंतर अखेर त्या तरुणीने दुकानं बंद केले.