बेळगाव : सिंहाने मोडला सिंहाचा विक्रम; लाखमोलाचा आनंद

बेळगाव : सिंहाने मोडला सिंहाचा विक्रम;
लाखमोलाचा आनंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. मात्र, निवडणुकीत कोण जिंकलं यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीला पडलेल्या मतांचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यावेळी म. ए. समितीने आपली ताकद लावीत राष्ट्रीय पक्षांची झोप उडवून टाकली. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना सर्वच ठिकाणी चांगला पाठिंबा मिळाला. सेना खासदार संजय राऊत, खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींनी बेळगावात येऊन घेतलेल्या प्रचारसभांनाही मोठी गर्दी झाली. मराठी मतदारांनीही मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केले आहे.
ज्यादिवशी तुम्ही हराल, त्यादिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमचीच जास्त चर्चा झाली पाहिजे... सिंहाने मोडला सिंहाचा विक्रम... आम्हाला कोण जिंकले याचे देणे घेणे नाही... हरलो तरी मैदान गाजवता आले पाहिजे... लाखमोलाचे ठरला शुभम तुम्ही, अशा आगळ्या संदेशांनी दिवसभर सोशल मीडियावर समितीचे उमेदवार शुभम शेळके चर्चेत राहिले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांना उमेदवार शुभम शेळके यांना किती मते पडणार, याची उत्सुकता होती.
मतमोजणीचे अपडेटस येत असताना शेळके यांनी एक हजार, दहा हजार मतांचा टप्पा गाठल्यानंतर सोशल मीडियावर जोशपूर्ण संदेश फिरू लागले. पंचवीस हजार, पन्नास हजारानंतर एक लाख या आकड्याची उत्सुकता होती. शुभम शेळके यांनी एक लाख मते मिळवल्यानंतर सोशल मीडियावर बहर आला. अनेक समिती कार्यकर्त्यांनी स्टेट्स लावून शेळके यांनी सव्वा लाख मतदान घेतल्याचा आनंद साजरा केला.
समितीच्या शुभम शेळके यांनी रचला इतिहास : 1998 च्या काळात माजी महापौर ए पी पाटील यांच्यापेक्षा जास्त मतं शेळकेला मिळाली आहेत. ए पी पाटील यांना 1 लाख 7 हजार मते मिळाली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सिंहाने मोडला सिंहाचा विक्रम; लाखमोलाचा आनंद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm