बेळगाव : दोन युवकांचा वीज पडून मृत्यू

बेळगाव : दोन युवकांचा वीज पडून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या दोन मेंढपाळ युवकांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी सायंकाळी हंचिनाळ (ता. सौंदत्ती) येथे घडली. हणमंत कारबारी (वय 19, रा. कोडलीवाड), होन्नाप्पा मबनूर (वय 14 दोघे. रा. माडमगेरी) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यरगट्टी येथील मेंढपाळ आपली बकरी घेऊन सौंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ येथे गेले होते.
दरम्यान शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सदर तरुण झाडाखाली थांबले होते. दरम्यान, वीज कोसळून दोघोचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विधानपरिषदेचे उपसभापती आणि आमदार आनंद मामनी यांनी शोक व्यक्त करुन सदर तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दोन युवकांचा वीज पडून मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm