बेळगाव : थोडक्यात हारले जारकीहोळी; मताधिक्य अवघ्या पाच हजारांवर आणले

बेळगाव : थोडक्यात हारले जारकीहोळी;
मताधिक्य अवघ्या पाच हजारांवर आणले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गेल्या चार लोकसभा निवडणुकांत बेळगाव लोकसभेत भाजपचे पाऊण लाखापासून साडेतीन लाखापर्यंत असलेले मताधिक्य काँग्रेसचे उमेदवार यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी अवघ्या पाच हजारांवर आणले. ते हरले असले, तरी त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुकच आहे. गतवेळी ते विधानसभा निवडणुकीत काठावर जिंकले होते आणि आज देखील ते थोडक्यात हरले आहेत. याची सतीश जारकीहोळी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत जारकीहोळी अवघ्या 5240 मतांनी पराभूत झाले आहेत.
2004 पासूनचा विचार करता सलग चारवेळा भाजपचे स्व. सुरेश अंगडी या मतदार संघातून निवडून आले होते. त्यांचे मताधिक्य कधी 75 हजाराच्या आत आले नव्हते. 2004, 2009 आणि 2019 या तिन्हीवेळा स्व. अंगडी यांनी अनुक्रमे 83 हजार, 1 लाख 18 हजार व 3 लाख 87 हजार असे मताधिक्य घेतले होते. 2014 मध्ये मात्र त्यांना बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँटे की टक्कर देत हे मताधिक्य 75 हजारांवर आणले होते. आता सुरेश अंगडी हयात नाहीत. परंतु, भाजपचे मुख्यमंत्री, राज्य पातळीवरील सर्व मातब्बर नेते एकत्रित येऊन श्रीमती मंगला अंगडीयांचा प्रचार करीत होते. सहानुभूतीची लाट आणि मातब्बरांचा प्रचार यामुळे भाजपची नाव सहजरित्या तरून जाईल, असे वाटत होते.
परंतु, सतीश जारकीहोळी यांनी भाजप उमेदवाराला काँटे की टक्कर देत हे मताधिक्क्य अवघ्या 5 हजारांवर आणले आहे.
जिंकलेही 2850 मतांनी : सतीश जारकीहोळी यांचा यमकनमर्डी मतदारसंघ हा बालेकिल्ला 2008 व 2013 मध्ये ते सुमारे 16 व 25 हजाराच्या मताधिक्याने जिंकले. परंतु, तीन वर्षांपूर्वीच्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मारुती अष्टगी यांनी त्यांना काँटे की टक्कर दिली होती. तेव्हा सतीश जारकीहोळी 2850 मतांनी जिंकले होते.
बेळगाव लोकसभा Result
उमेदवार मतं
मंगला अंगडी 440327
सतीश जारकीहोळी 435087
शुभम शेळके 117174

एकूण : 1011616
INC सतीश जारकीहोळी | बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक | एकूण झालेलं मतदान
मतदार संघ झालेल मतदान
बेळगाव उत्तर 51427
बेळगाव दक्षिण 30369
बेळगाव ग्रामीण 47796
अरभावी 71700
गोकाक 59398
बैलहोंगल 49708
सौंदत्ती-यल्लम्मा 64056
रामदुर्ग 58428
एकूण 4 लाख 32 हजार 882
BJP मंगला अंगडी | बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक | एकूण झालेलं मतदान
मतदार संघ झालेल मतदान
बेळगाव उत्तर 38668
बेळगाव दक्षिण 53226
बेळगाव ग्रामीण 47688
अरभावी 55957
गोकाक 87307
बैलहोंगल 49616
सौंदत्ती-यल्लम्मा 47497
रामदुर्ग 56909
एकूण 4 लाख 36 हजार 868
समिती शुभम शेळके | बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक | एकूण झालेलं मतदान
मतदार संघ झालेल मतदान
बेळगाव उत्तर 24594
बेळगाव दक्षिण 44950
बेळगाव ग्रामीण 45536
अरभावी 459
गोकाक 448
बैलहोंगल 286
सौंदत्ती-यल्लम्मा 3956
रामदुर्ग 4419
एकूण 1 लाख 24 हजार 648

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : थोडक्यात हारले जारकीहोळी; मताधिक्य अवघ्या पाच हजारांवर आणले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm