बेळगाव : 'बजरंगी भाईजान'च्या मदतीमुळे दोघेही आपल्या गावी सुखरूप Video

बेळगाव : 'बजरंगी भाईजान'च्या मदतीमुळे दोघेही आपल्या गावी सुखरूप Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील अनेक राज्यात पुन्हाएकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यासर्व गोष्टींचा मोठा परिणाम देशातील गरिब जनतेवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सध्या अनेक क्षेत्रातील लोक, सामाजिक संस्था कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. यात बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते उर्फ बजरंगी भाईजान विनायक केसरकर यांचाही समावेश आहे. गोवा येथे फसवणूक झाल्यानंतर बेळगाव गाठणाऱ्या उत्तराखंड आणि मुंबई येथील दोघा असहाय्य कामगारांना मदतीचा हात देताना श्री विनायक केसरकर यांनी त्या दोघांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर आता पुन्हा लाॅकडाऊनमुळे बिकट परिस्थितीत त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
उत्तराखंड येथील दिनेश सिंग आणि मुंबई येथील भाऊसाहेब घोदे हे दोघेजण कामानिमित्त गोव्याला गेले होते. परंतु गोवा येथे फसवणूक झाल्यामुळे ते वापस थेट बेळगावात येऊन पोहोचले. तेंव्हा खिशात फक्त 100 रुपये अशा अवस्थेत ते सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांना आढळून आले. विनायक यांनी त्यांची विचारपूस करून सर्व घटना जाणून घेतली. तसेच त्या दोघांना काकती येथील एका हॉटेलात काम दिले. त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे हॉटेल देखील झाले आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. कालांतराने ते दोघेही आजारी पडले. त्यांना पुन्हा विनायक केसरकर यांच्या प्रयत्नातून उपचार मिळाले. त्यातील एक जण खूप आजारी होता. मात्र त्याला देखील बरे करण्यात आले.
दरम्यान हॉटेल मालकाने त्यांना त्यांचा पूर्ण पगार दिला. लाॅकडाऊनमुळे दिनेश सिंग आणि भाऊसाहेब घोदे यांच्या इच्छेनुसार त्यांना काल 30 एप्रिल 2021 रोजी मुंबईच्या रेल्वेने पाठविण्यात आले. त्यातील भाऊसाहेब हा मुंबईतील आहे, तो तिथे त्याच्या भावाकडे वास्तव्यास असणार आहे. उत्तराखंडातील दिनेशसिंग पुढे मुंबईतून उत्तराखंडला जाणार आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या बिकट परिस्थितीत अशा प्रकारे विनायक केसरकर यांनी आपल्याला सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केल्याबद्दल दिनेश सिंग आणि भाऊसाहेब घोदे यांनी केसरकर यांचे शतशः आभार मानले आहेत.
YouTube Video पाहा
Watch YouTube Video
भाऊसाहेब घोदे याने तर विनायक केसरकर सरांच्या रूपात मला देवच भेटला असे सांगून केसरकर यांनी आपली कामे सोडून आम्हाला इतकी मदत केली की आम्हाला नोकरी नव्हती नोकरी लावली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हॉटेल बंद पडले. मी आजारी पडलो. परंतु विनायक सरांनी सख्या भावाप्रमाणे माझी काळजी घेतली मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, असे घोदे म्हणाला. यापूर्वी कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या कालावधीत नेपाळच्या एका व्यक्तीसह अन्य कांही असहाय्य व्यक्तींना विनायक केसरकर यांनी त्यांच्या मूळ गावी जाण्यास मदत केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'बजरंगी भाईजान'च्या मदतीमुळे दोघेही आपल्या गावी सुखरूप Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm