बेळगाव : एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी माणुसकीचे दर्शन

बेळगाव : एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी माणुसकीचे दर्शन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : असं म्हटले जातं, की मनुष्य आयुष्य जगत असताना त्याचं अर्ध आयुष्य हे रांगेत नंबर लावण्यातच जातं. परंतु आयुष्य संपल्यानंतरही त्याला रांगेत उभ रहावं लागेल, असे कधी कुणालाही स्वप्नात वाटलं नसेल; परंतु या कोरोनाच्या महामारीत तेदेखील बघायला मिळाले. अशीच काहीशी घटना या बेळगाव शहरामध्ये बघायला मिळाली. एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी रीतिरिवाज, परंपरेला बाजूला सारत माणुसकीचे दर्शन घडविले. अल्पशा आजाराने निधन झालेल्या निराधार वृद्धावर श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
समादेवी गल्ली येथील पंत वाड्यातील रहिवासी राजू कामत (वय 62) यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. ते वृद्ध बहिणीसह राहत होते. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्याची अडचण निर्माण झाली. मृताच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांच्याशी संपर्क साधून अडचण सांगितली. केकरे यांनी श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मोबाईलवरून माहिती दिली. मदत करण्याचे आवाहन केले. ही माहिती समजताच श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या शववाहिकेतून मृतदेह सदाशिवनगरच्या स्मशानभूमीत नेण्यात आला. त्याठिकाणी विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते राहुल आवळे म्हणाले, वृद्धाचे निधन झाल्याची माहिती मिळताच मानवतेच्या दृष्टीने आम्ही धाव घेतली. त्यांच्या पश्चात केवळ एकटी वृद्ध महिला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करणे अवघड होते. याची जाणीव होताच आम्ही मनपाच्या शववाहिनीतून मृतदेह नेऊन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी नारू निलजकर, राजेंद्र बैलूर, पप्पू कोरे, आतिश धाटोंबे आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी माणुसकीचे दर्शन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm