बेळगाव : उड्डाण पुलावरून कार कोसळून प्राध्यापक ठार

बेळगाव : उड्डाण पुलावरून कार कोसळून प्राध्यापक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : संकेश्वरजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील सोलापूर गेट उड्डाण पुलाजवळ भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये प्राध्यापक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अनिलकुमार राजाराम चव्हाण (वय 50, सध्या रा, समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर, हिंडलगा. मूळ गाव मणेराजुरी, ता. तासगाव, जिल्हा सांगली) असे त्यांचे नाव आहे.
अनिलकुमार चव्हाण हे कारने (MH 10 BM 1605) पत्नी शुभांगीसह सांगलीहून सासऱ्यांचे अंत्यसंस्कार उरकून बेळगावकडे परतत असताना शुक्रवारी सकाळी 6.50 वा. वाजता हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर फाट्याजवळील उड्डाण पुलावरून गाडी सुमारे 30 फूट खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शुभांगी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अनिलकुमार चव्हाण 1996 पासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे भौतिकशास्त्रचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. सध्या ते भौतिकशास्त्र विभाग प्रमुख होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी पाहणी करून पंचनामा केला. संकेश्वर पोलिस स्थानकामध्ये घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : उड्डाण पुलावरून कार कोसळून प्राध्यापक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm