बेळगाव : भीषण अपघातात तीन ठार

बेळगाव : भीषण अपघातात तीन ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : गोकाकपासून जवळच असणाऱ्या हल्लूर (ता. मुडलगी) येथे थांबलेल्या कार गाडीला सिमेंट भरलेल्या टिप्परने धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. शांतव्वा भागोडी (वय 50), दुंडव्वा उळागड्डी (वय 60), लक्ष्मी भागोडी (वय 5) हे तिघे ठार झाले. सुनंदा भागोजी (वय 50) या गंभीर जखमी झाल्या. अपघातग्रस्त सर्व रा. हल्लूर येथील आहेत.
हल्लूर येथील बागडी कुटुंबात घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी शेतवाडीत रात्री जाऊन स्वयंपाक करून मध्यरात्री 2.30 सुमारास घरी येत असताना मुधोळ-निपाणी रस्त्यावरील हल्लूर गुब्बी बसस्थानकासमोर कारचालक वाहन थांबवून खाली उतरला. यावेळी यादवाडहून पुण्याकडे सिमेंट भरून जाणाऱ्या टिप्परने (MH 12 NH 7010) कारला जोराने धडक दिल्याने कारमधील सुनंदा या जागीच ठार झाल्या.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भीषण अपघातात तीन ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm