बेळगाव : मारहाण प्रकरणी तिघांना अटक

बेळगाव : मारहाण प्रकरणी तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पूर्ववैमनस्यातून नवी गल्ली - शहापूर येथे येथील एका तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरून शहापूर पोलिसांनी त्याच परिसरातील तिघा जणांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. रब्बानी इलियास नाईकवाडी (वय 19, रा. नवी गल्ली, शहापूर) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
त्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून अरिहंत श्रीधर जक्कण्णावर, अभिजित श्रीधर जक्कण्णावर, अजित श्रीधर जक्कण्णावर या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये गवतगंजी पेटविल्यावरून नवी गल्ली येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या कारणातून ही मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वैमनस्यातून मंगळवारी रात्री हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मारहाण प्रकरणी तिघांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm