बेळगाव : 60 क्विंटल तंबाखूजन्य पदार्थ जप्त

बेळगाव : 60 क्विंटल तंबाखूजन्य पदार्थ जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर शहरातील निर्बंधित सामग्रीची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा घालण्याचा धडाका प्रांताधिकारी अशोक तेली यांनी सुरूच ठेवला आहे. गुरुवारी सकाळी बाहेर गल्लीतील कित्तूर ट्रेडर्स दुकानावर छापा टाकून 30 क्विंटल सुटा तंबाखू आणि 30 क्विंटल तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. खानापूर शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने हा कारवाईचा सपाटा हाती घेण्यात आला आहे.
दुकानातून खुल्या विक्रीवर निर्बंध असलेल्या तंबाखू पदार्थांचा साठा आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. नियमानुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनांवर लेबलिंग, आरोग्य विषयक सूचना, चित्र आणि निकोटिन व टार यांची मात्रा याबाबतची माहिती पॅकिंगवर नमूद करणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने 30 क्विंटल तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आले.
तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्याधिकारी डॉ संजीव नांद्रे, पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, शिवानंद कारजोळ, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक एस. आर. पाटील, प्रेमानंद नाईक यांनी या कारवाईत भाग घेतला.
खानापूर शहर आणि तालुक्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई असून यामुळे चोरून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ शरीराला हानिकारक आहेत. त्याची विक्री करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 60 क्विंटल तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm