बेळगाव : मोफत रुग्णवाहिका; दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर देवस्थान कमिटी

बेळगाव : मोफत रुग्णवाहिका;
दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर देवस्थान कमिटी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिर देवस्थान कमिटीने गतवर्षीप्रमाणे रुग्णसेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय केली आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागीलवर्षी कोरोना व अतिवृष्टीच्या काळात देवस्थान कमिटीने मदतकार्य केले होते. दोन महिन्यापूर्वी महाव्दार रोड व फुलबाग गल्लीत दोन घरे जळाली होती. त्या जळीतग्रस्तांना देवस्थान कमिटीतर्फे एक महिन्याचे रेशन देण्यात आले होते. आता पुन्हा लॉकडाउन सुरु झाले आहे.
या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना विशेषता गर्भवती महिला, हृदयविकाराने त्रस्त रुग्ण, डायलिसिस रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी देवस्थान कमिटीने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. गरजू रुग्णांनी रुग्णवाहिकेसाठी सुनील बाळेकुंद्री (990253967), राजू भातखंडे (9247145507) किंवा विवेक पाटील (9845236895) यांच्याशी संपर्क साधावा. रुग्णवाहिका सेवा 24 तास सुरु असणार आहे, अशी माहिती कपिलेश्वर देवस्थान कमिटीने दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मोफत रुग्णवाहिका; दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर देवस्थान कमिटी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm