बेळगाव : तिघांना अटक; 25 ते 30 हजाराला विकत होते रेमडेसिवीरचा इंजेक्शन

बेळगाव : तिघांना अटक;
25 ते 30 हजाराला विकत होते रेमडेसिवीरचा इंजेक्शन

belgavkar.com | belgaum | belgavkar

रेमडेसिवीरचा काळाबाजार;

बेळगाव : सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत देखील उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. बेळगावात देखील असा प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याप्रकरणी सीसीबी विभागाच्या पथकाने तिघांना अटक केलीयं. मंजुनाथ दुंडाप्पा दानवाडकर (वय 35, मूळनिवासी रामपूर, बनहट्टी-रबकवी, जि. बागलकोट, सध्या रा. शाहुनगर, बेळगाव) आणि संजीव चंद्रशेखर माळगी (वय 33, मूळनिवासी नवनगर बैलहोंगल, सध्या रा. शिवाजीनगर, बेळगाव) आणि महेश चंगलगुत्ती (वय 28 रा. बिळगी, जि. बागलकोट) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
साध्या वेशातील पोलिसांनी सर्वसामान्य नागरिक असल्याचे भासवत आरोपींकडे जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. आपल्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर असल्याने कोणत्याही किंमतीत आपल्याला ते हवे असल्याचे सांगताच रेमडेसिवीर देऊन पैसे घेत असताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडील 11,600 रुपये किंमतीच्या रेमडेसिवीर औषधाच्या 3 बाटल्या जप्त केल्या. मंजुनाथ आणि संजीव हे उभयता बेळगाव शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होते. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून त्याची काळ्याबाजारात आपण विक्री करत असल्याचे त्यांनी कबूल केले.
या प्रकरणातील तिसरा संशयित महेश याने या दोघांकडून रेमडेसिवीरचे इंजेक्शन घेऊन ते अन्य व्यक्तीला विकण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महेश हा शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून काम करतो. माळमारुतीचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकार्यांनी त्याला अटक केली. 3,400 रुपये किमतीचे इंजेक्शन काळ्याबाजारात 25 ते 30 हजार रुपयाला विकत होते. अधिक पैशाच्या हव्यासापोटी आपण हे कृत्य करत होतो, असे त्यांनी सांगितले. यामुळे बेळगावात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन यांनी सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणवर तुटवडा निर्माण झाल्याने करोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. तरीही इंजेक्शन मिळत नसताना दुसरीकडे मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तिघांना अटक; 25 ते 30 हजाराला विकत होते रेमडेसिवीरचा इंजेक्शन
रेमडेसिवीरचा काळाबाजार;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm