बेळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाला. ही घटना बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथील सौंदत्ती क्रॉस रस्त्यावर घडली. महावीर भोजकर (वय 35, रा. मांजरी, ता. चिकोडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मांजरी येथील महावीर भोजकर कामानिमित्त नसलापूर येथे गेला होता. सोमवारी रात्री काम आटोपून मांजरीकडे येत असताना सौंदत्ती क्रॉस येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर अज्ञात वाहनचालक फरारी झाला.