बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार; धमकी दिल्याची तक्रार

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार;
धमकी दिल्याची तक्रार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरापासून बलात्कार करणाऱ्या उचगाव येथील युवकावर पोलिसांत पुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महात्मा फुले रोड येथील 24 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर त्या मुलीने खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये त्या युवकाच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल मधुकर देसाई (रा. रवळनाथ गल्ली, उचगाव) असे त्याचे नाव आहे. त्या युवकाला अटकही झाली होती.
त्यानंतर जामिनावर सुटून आल्यानंतर आपल्याला धमकी दिल्याची तक्रार सदर युवतीने शहापूर पोलिसांत दिली आहे. संशयित युवकाने महात्मा फुले रोड येथील एका युवतीवर लैंगिक अत्याचार केले होते. तब्बल एक वर्ष त्याने हा प्रकार केला. मात्र त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे त्या त्रस्त तरुणीने 4 एप्रिल 2021 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली. हा अत्याचार खडेबाजार परिसरातील एका अपार्टमेंटमधील खोलीत झाल्याने खडेबाजार पोलिसांनी याची नोंद करून घेतली होती. यानंतर सदर युवकाला अटक होऊन त्याची कारागृहात रवानगी झाली होती.
परंतु तो बाहेर आल्यानंतर त्याने सदर युवतीला व तिच्या घरच्यांना धमकी देत असल्याचे शहापूर पोलिसांना सांगितले. या प्रकरणी त्याच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेनंतर त्याने त्या युवतीला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकी दिली आहे. त्यामुळे शहापूर पोलीस स्थानकात त्या युवकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक राघवेंद्र हावलदार तपास करीत आहेत. संशयित आरोपी युवकाच्यावतीने अँड. प्रताप यादव काम पाहत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार; धमकी दिल्याची तक्रार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm