बेळगाव : हुबळीजवळ अपघातात पोलिस निरीक्षक जखमी; मेहुणा जागीच ठार

बेळगाव : हुबळीजवळ अपघातात पोलिस निरीक्षक जखमी;
मेहुणा जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव रहदारी उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक महाबळेश्वर नाईक (वय 45, रा. शिर्शी, जि. कारवार) यांच्या वाहनाला हुबळीजवळ अपघात होऊन ते जखमी झाले असून, त्यांचे मेहुणे जागीच ठार झाले. गुरूप्रसाद गणपती नाईक (वय 33, रा. मेणसी, ता. शिर्शी, जि. कारवार) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7.15 वा. हुबळीजवळील देवरहुबळी अंडरपासजवळ हा अपघात घडला.
हुबळी वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाबळेश्वर हे सध्या रजेवर होते. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीवेळी झालेल्या बदल्यांवेळी श्री. नायक बेळगाव उत्तर वाहतूक पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रुजू झाले. शिर्शीहून बुधवारी पहाटे 5 वा. ते बेळगावला येण्यासाठी निघाले. त्यांच्यासमवेत त्यांचे मेहुणे गुरूप्रसाददेखील होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तडस क्रॉसजवळील हॉटेलमध्ये नाश्ता केला. यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. महाबळेश्वर स्वतः कार चालवत होते.
देवरहुबळीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून कॅन्टर आला. त्याला चुकविण्यासाठी त्यांनी वाहन डाव्या बाजूला वळवले. तेव्हा नियंत्रण सुटून रस्ता सोडून कार बाजूच्या जंगल भागातील खड्ड्यांमध्ये घुसली. समोरील एका दगडाला आदळून थांबली. निरीक्षकांनी बेल्ट लावलेला असल्याने ते जखमी झाले. गुरुप्रसाद यांनी बेल्ट न लावल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वर एस. नायक यांची प्रकृती स्थिर आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हुबळीजवळ अपघातात पोलिस निरीक्षक जखमी; मेहुणा जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm