बेळगाव : मारहाणीत येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

बेळगाव : मारहाणीत येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतदानाच्या दुसर्‍या दिवशीच दारूच्या नशेत तिघांनी येळ्ळूरच्या (ता. बेळगाव) माजी ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला केला होता. निवडणूकीतील दारू या क्षुल्लक कारणावरून येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्याला बेदम मारहाण झाली होती. रविवार (18 एप्रिल) रात्री ही घटना घडली होती. मुकुंद घाडी (वय 42, रा. परमेश्वरनगर) यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
त्यांची पत्नी भारती घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुनील कुंडेकर, नागराज मजुकर, अनूज कुगजी (सर्व रा. मारुती गल्ली, येळ्ळूर) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री वरील तिघांनी माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद घाडी यांच्याबरोबर वाद काढून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांनी जाब विचारताच तिघांनीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते.
मारहाणीत जखमी मुकुंद याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने येळ्ळूरच्या केएलई या खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मारहाणीत येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm