बेळगाव : NH4वर हेब्बाळजवळ अपघातात युवक ठार

बेळगाव : NH4वर हेब्बाळजवळ अपघातात युवक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर (NH4) हेब्बाळजवळ दुचाकी आणि मालवाहू टेम्पो यांचा अपघात झाला असून यामध्ये दुचाकी चालक ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी 9 वाजता झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर बाजूला थांबलेल्या मालवाहू टेम्पोला (KA 22 C 9621) काकती (बेळगाव) हून भरधाव वेगाने येणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने (KA 23 EV 3989) मागून जोराची धडक दिली.
दुचाकी चालक मुनासीफ न्यामत मोमीन (वय 21, रा. जुना पुणे-बेंगलोर रोड, संकेश्वर) याच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याला उपचारासाठी नेण्यात येत असताना उपचारापूर्वीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला सुफीयान सर्फराज मोमीन (वय 17 रा. गांधीनगर , हुक्केरी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमीला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुनासीफ आणि सुफीयान हे दोघेही काकती (बेळगाव) येथील मामा आणि नातेवाईकांना भेटून परत येत होते. वाहनचालक मारुती यशवंत कोरवी (रा. कोट, ता. हुक्केरी) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास संकेश्वर पोलिस करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : NH4वर हेब्बाळजवळ अपघातात युवक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm