बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सोमवारी होणार सांगता; ज्वालेसाठी आवाहन

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सोमवारी होणार सांगता;
ज्वालेसाठी आवाहन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदू धर्मासाठीचे बलिदान तरुणांना समजावे, या हेतूने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणात आणला जातो. बलिदान मासची सांगता सोमवार 12 एप्रिल रोजी होणार आहे. फाल्गुन अमावस्या (मृत्युंजय अमावस्या) धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी आपल्या प्राणाचं तब्बल 40 दिवस औरंगजेब चे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं ते बलिदान हिंदूधर्म कधीच विसरू शकत नाही.
तत्पूर्वी धर्मवीर संभाजी ज्वालेचे वढू बुद्रुक - सांगली - बेळगावमध्ये आगमण झाले असून तालुक्यातील प्रत्येक गाव, विभाग यांनी ही ज्वाला रविवार 11 एप्रिल रोजी सकाळी 6 ते सायंकाळपर्यंत घेऊन जायची आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. याची आठवण म्हणून धारकरी एक महिना बलिदान मास आचरणात आणतात. या महिन्यात एखादी आवडती वस्तू किंवा पदार्थ वर्ज केला जातो. तसेच काहीजण मुंडणही करून घेतात. या बलिदान मासची सांगता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केली जाते.
सोमवार 12 रोजी बलिदान मासची सांगता होणार आहे. सोमवारी सकाळी 6.30 वा. छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा मूकपद्धतीने काढली जाणार आहे. कपिलेश्वर रोड, हेमू कलानी चौकमार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीसमोर ही ज्वाला विधिवत पूजन करून शांत केली जाणार आहे. यावेळी सर्व शिवप्रेमींना व धारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव
बेळगामधुन प्रतीवर्षाप्रमाणे वढू बुद्रुक - सांगली - बेळगाव येथे आणलेली धर्मवीर ज्वाला बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे, यासाठी ज्वाला प्रज्वलीत करून दिली जाणार आहे. सर्व गावांनी ज्वाला घेऊन जायची आहे याची सर्व विभाग प्रमुख, गाव प्रमुख व सर्व प्रमुख धारकर्‍यांनी याची नोंद घ्यावी.
ठिकाण - श्री सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली बेळगाव येथून घेऊन जावे.
संपर्क - अनंत चौगुले -919141807155, 919480498710, गजानन पवार - 9449383742

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासची सोमवारी होणार सांगता; ज्वालेसाठी आवाहन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm